अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशनची स्थापना

अमरावती- गुन्हेगारी जगतातील संपूर्ण घडामोडी लोक दरबारी पोहोचविणे आणि या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मागदर्शन करणे, याच मूळ उद्देशातून स्थापन झालेल्या क्राईम रिपोर्टर असोशियन, अमरावतीची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली.
अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशन ही संघटना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीबध्द करण्यात आली आहे. या माध्यमातून समाज हिताचे उपक्रम राबविले जाणार आहे. क्राईम रिपोर्टर असोशिएशनच्या अध्यक्ष पदी रविंद्र खंडारे, उपाध्यक्ष रुपेश देशमुख, सचिव अभिलाष मिश्रा, सहसचिव शाहबाज खान, कोषाध्यक्ष वैभव बाबरेकर यांचा समावेश आहे. सदस्यामध्ये पवन श्रीवास्तव, सुदेश चव्हाण, स्वराज माहोरे, गजानन श्रुंगारे, संतोष तापकिरे, नासिर हुसैन यांचा तर सल्लागार समितीत प्रदिप भाकरे व अनुप गाडगे यांचा समावेश आहे. गुरुवारी क्राईम रिपोर्टर असोशिएशनची जिल्हा परिषदेच्या विश्राम गृहात बैठक पार पडली असून, असोशिएशनमार्फत होणार्या समाजाउपयोगी कामकाजावर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top