हिराबंबई सर्कलमध्ये वाघाचा मृत्यू

अमरावती-
एकीकडे अमरावती शहरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे वन्यक्षेत्रात वन्यजीव सुरक्षित नसल्याचे चित्र मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत सुसर्दा वनपरिक्षेत्रात हिरा बंबई सर्कलमध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यूमुळे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पंधरवड्यापासून अमरावती जिल्ह्यात बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे. व्हीएमव्ही परिसरातील मनीपूर लेआउâटमध्ये बिबट तर दस्तूरनगर चौकात सायाळ यांचा मुक्तसंचार सुरू आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अयशस्वी ठरला आहे. तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचे अस्तित्व असलेल्या व सुरक्षितता असलेल्या वनपरिक्षेत्रात वाघांचा मृत्यू होत आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी वनकर्मचारी जंगल गस्तीवर असताना सकाळच्या सुमारास त्यांना मृतावस्थेत वाघ दिसला. घटनेची माहिती मिळताच सुसर्र्दा वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर, सहाय्यक वनसंरक्षक महल्ले हे घटनास्थळी रूजू झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top