सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा अजब खाक्या?

अकोट नाका ते पोपटखेड रोड आय.टी.आय च्या निर्मितीत सोडले ३०० मिटरचे ठिगळ…

अकोट ( मोबिन शेख )-
सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोटच्या रस्ते, ( पुल इमारती अश्या विविध प्रकारच्या विकास कामांमध्येच अपुर्ण पुल अपुर्ण इमारती अपुर्ण रस्ते असे सदैव विचित्र कामे पहावयास मिळत असून सतत १० . वर्षापासुन आकोट च्या विकास कामांची गंगा सुरू असुन मात्र जेथे तेथे अपुर्ण कामांनी या विभागाच्या विचित्र तुघलकी कामांनी जनता मात्र रडकुंडीस आली आहे. यामुळेच आशिष महेंद्र तरडेला सारखे सजग, जागृत नागरिक या विभागाच्या कामा विरुद्ध उच्च न्यायालयात विकासाच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करित •आहेत. ६ वर्षापासुन दुर्लक्षित रस्ता नुकताच ४ दिवसांत डांबरीकरण झाल असुन ” आकोला नाका ते आकोट न्यायलय ” व रफिक सॉ मिल ते मारुती टाईल्स पोपटखेड रोड ” पर्यंत रस्त्याचे अति वेगाने डांबरीकरण झाले असुन मात्र “आकोट न्यायालय ते रफिक सॉ मिल ही ३०० मिटर अंतराची सडक मात्र विकासापासुन वंचित राहील्याने शेकडो नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कार्यप्रणालीकडे डोळे विस्कारून असा कसा विकास ? असा प्रश्न उपअभियंत्याला करित असल्याचे दिसत आहेत. चर्चेला ऊत आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top