World Cup 2023….

आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताच्या किंग कोहलीलाही टाकले मागे

मुंबई-
देशात २०२३चा विश्वचषक सुरू आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात अनेक रेकॉर्ड बनत आहेत तसेच तोडले जात आहेत. या विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि द. आफ्रिकेच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. द. आफ्रिकेचे फलंदाज खासकरून भारतात शानदार खेळ करत आहेत.

२०२३च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत द. आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाने सर्वाधिक वेळा ३००हून जास्त स्कोर केला आहे. मंगळवारी बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने ३८२ धावा केल्या. या सामन्यात सलामीवीर क्विंटन डी कॉकने १७४ धावांची खेळी केली. यासोबतच तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

क्विंटन डी कॉकने कोहलीला टाकले मागे
बांगलादेशविरुद्ध १७४ धावांची खेळी करत २०२३च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत क्विंटन डी कॉक पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. डीकॉकने या विश्वचषकात ८१.४०च्या सरासरीने ४०७ धावा केल्या. तर विराट कोहलीच्या नावावर ११८.००च्या सरासरीने ३५४ धावा आहेत. सर्वाधिक धावा कऱणाऱ्यांच्या टॉप १०च्या यादीत द. आफ्रिकेचे तीन तर भारताचे दोन खेळाडू सामील आहेत.

२०२३च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा कऱणारे फलंदाज
क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका) – ४०७ धावा
विराट कोहली(भारत) – ३५४ धावा
रोहित शर्मा(भारत)- ३११ धावा
मोहम्मद रिझवान(पाकिस्तान) – ३०२ धावा
रचिन रवींद्र (न्यूझीलंड) – २९० धावा
हेनरिक क्लासेन(दक्षिण आफ्रिका)- २८८ धावा
डेरिल मिचेल(न्यूझीलंड) – २६८
एडेन मार्करम (दक्षिण अफ्रीका)- २६५ धावा
अब्दुल्ला शफीक (पाकिस्तान)- २५५ धावा
डेवोन कॉनवे (न्यूझीलंड)- २४९ धावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top