श्री हव्याप्र मंडळाच्या दसरा महाेत्सवाला अखंड भारताचे स्वरूप

२५ राज्यातील २५०० विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती 

अमरावती-

 जिल्ह्याचं कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी नवरात्राेत्सवाला स्फुरण चढते ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महोत्सवाने. दशमीला देवींच्या सिमाेल्लंघनानंतर स्थानिक अमरावती-बडनेरा मार्गावरील दसरा मैदानवर दसरा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. मंडळामध्ये शिकत असलेले २५ राज्यातील तब्बल २५०० विद्यार्थ्यांनी पारंपारीक खेळ, याेग-व्यायाम आणि संस्कृती दर्शनातून चित्तथरारक कवायती सादर करीत महोत्सवाला अखंड भारताने स्वरूप दिले.

मंगळवार दि.२४ ऑक्टाें. राेजी सायं.५.३० वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महाेत्सवाला सुरूवात झाली. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजीत या महाेत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी साैरभ कटीयार, पाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व आ. रवी  राणा उपस्थित हाेते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके आदी मान्यवर उपस्थित हाेते.

राष्ट्रगीत व वंदनेने दसरा महाेत्सवाला सुरूवात झाली. यानंतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी डम्बेल्स कवायत, मल्लखांब, रोप मल्लखांब, दंड बैठक, रायफल डील, गाेला ड्रिल, विटा फेक, भाला  ड्रिल, सिंगल दांड पट्टा, डबल दांड पट्टा, दांड पट्टा ड्रिल, लेझीम, सिंगल लाठी, दाे हाती तलवार, ढाल तलवार, एराेबिक्स, याेगा ड्रिल, जिम्नाेस्टिक्स, रशियन ड्रिल, बाॅक्सींग, तायकांडाे, बाॅडी बिल्डिंग, सिंगल बनेटी, दाे हाती बनेटी, चेन बनेटी, जलती जाेडी टाॅर्चेस मार्चिंग, लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. विजय पांडे, डाॅ. विलास दलाल व प्रा. आनंद महाजन यांनी केले.
दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण
श्री हव्याप्र मंडळाच्या दसरा महाेत्सवामध्ये सादर हाेत असल्या चित्तथरारक कवायती, खेळ आणि व्यायाम पाहता अशा प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण आजच्या विद्यार्थ्यांना नितांत गरजेचे आहे, जे वर्तमान शिक्षण व्यवस्थेतून मिळत नाही. मागील अनेक दशकांपासून श्री हव्याप्र मंडळ क्रीडा क्षेत्रामध्ये समर्पित कार्य करीत आहे. येथील विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पाेलीस विभागात कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो. अशा प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येक युवकाने आणि युवापीढीने आत्मसात करावे असे आवाहन पाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केले.
प्रेरणादायी साेहळा
१९१४ मध्ये स्थापन झालेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील ९० वर्षांपासून दसरा महाेत्सवाच्या माध्यमातून समाजाला निराेगी आराेग्य आणि बलवान समाजाची प्रेरणा देत आहे. या महाेत्सवामध्ये देशातील विविध राज्यातील विद्यार्थी तालबद्ध आणि एकरूप हाेवून विविध खेळ व कवायती सादर करतात. हे पाहतांना अखंड भारताचे हाेणार दर्शन गाैरवास्पद आहे. खेळ आणि व्यायाम प्रत्येक युवकाने आत्मसात करणे नितांत गरजेचे असून याद्वारे निराेगी आरोग्यासह उज्वल भवितव्य साकार हाेण्यास मदत हाेते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य प्रेरणादायी आणि देशहिताचे असल्याचे मत जिल्हाधिकारी साैरभ कटीयार यांनी व्यक्त केले.
यशस्वी खेळाडूंचा सत्कार
उजबेकिस्थान येथे पार पडलेल्या १३ व्या एशियन अॅक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जिम्नास्टिक विभागप्रमुख प्रा. आशिष हाटेकर यांनी दुसऱ्यांदा भारतीय संघ व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मंडळाचे जिम्नॅस्टिकपटू क्रीष्णा भट्टड व हिमांशू जैन यांनी देशासाठी रजत पथक पटकावले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावती जिल्ह्यासाठी हा मोठा बहुमान ठरला. शूटिंग विभागाचे विभाग प्रमुख राहुल उघडे व शूटिंग विभागाचे विद्यार्थी जानवी मानतकर, कृष्णा शेळके व पुष्कर निर्मळ यांनी राज्य शूटिंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल दसरा मैदान येथे आयोजित दसरा महोत्सवांमध्ये या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top