विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन २८ आक्टोबर रोजी

अकोट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अकोट नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन शनिवार दि.२८ ऑक्टोम्बर रोजी सांयकाळी ६.१५वाजता श्री सरस्वती विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवात संघप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  ह.भ.प.श्री संत वासुदेवराव अं. महल्ले (अध्यक्ष  श्री.संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था), श्रीक्षेत्र श्रद्धासागर अकोट हे राहणार असून प्रमुख वक्ते. मा. प्रा.रविंद्रजी भुसारी जेष्ठ प्रचारक नागपूर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहे.या कार्यक्रमाला सर्व नागरिक बंधू भगिनी वेळेपुवी उपस्थित राहावे.असेआवाहन आकोट नगरकार्यवाह अजय म.कुळकर्णी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top