अचलपूर शहरातील श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये चांदीचे मुकुट लंपास

अचलपूर (प्रतिनिधी)-

अचलपूर शहरातील बुंदेलपुरा येथील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये काल २४ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी श्री कार्तिक स्वामी भगवान येथील चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार,अचलपूर शहरातील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये श्री कार्तिक स्वामी भगवान येथे जवळ्पास ७५० ग्राम चांदीचे छत्र व मुकुट अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे.आज सकाळी भाविक – भक्त दर्शनासाठी गेले असतां श्री कार्तिक स्वामी मंदिराला असलेले कुलूप अज्ञात चोरट्यानी तोडून चांदीचे छत्र व मुकुट लांबविले आहे .या बाबत अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली असून पुढील तपास अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे . या पूर्वी सुद्धा या मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top