शेतीचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

वर्धा वृत्तसेवा-
मौजा साठोडा येथील शेत शिवारामधून तीन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य चोरणाऱ्या तिघांना सावंगी पोलिसांच्या गुन्हे प्रगटी करण पथकाने ताब्यात घेत चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साठोडा येथील शेतकरी आकाश बंडूजी धांदे यांच्या शेता मधील ३० जून रोजी अज्ञात चोरट्यांनी विहिरीवरील मोटार,सोयाबीन काढणाऱ्या यंत्राची मशीन आणि त्याच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य चोरून नेले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.पोलीस निरीक्षक धनाजी जळक व गुन्हे प्रगटी करण पथकाने तीन संशयितांकडून चौकशी केली असता, शेतातील शेती उपयोगी साहित्य चोरले असल्याचे निष्पन्न होताच,आरोपी आशीष नरेश घोंगडे वय २८ वर्ष रा येळाकेळी,नारायण पुरुषोत्तम पाराशर वय २३ वर्ष रा येळाकेळी व एक विधी संघर्षीत बालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरी करण्यात आलेले साहित्य विकत घेणाऱ्या भंगार विक्रेत्याकडून साहित्य जप्त करीत गुन्ह्यात वापर करण्यात आलेला ऑटोसह ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.खरांगणा व देवळी या ठिकाणी सुद्धा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनाजी जळक,गुन्हे प्रगटी करण पथकातील सतीश दरवरे,अनिल वैद्य, भुषन निघोट, स्वप्नील मोरे, निलेश सडमाके, निखील फुटामे, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास पोलीस स्टेशन सावंगी करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top