चितळ प्राण्याचे मास खाणाऱ्या हॉटेल मालकासह चार आरोपींना अटक

वर्धा / रवींद्र लाखे
चितळ प्राण्याची शिकार करीत त्या मासाची पार्टी करणाऱ्या फरार हॉटेल मालकाला वन विभागाच्या पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली आणि तीन आरोपींना सोमवारी अटक केली असून,चारही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
सावंगी मार्गावरील टी पॉईंट येथील ठाकरे हॉटेल मध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी चितळ प्राण्याची शिकार करुन पार्टी करण्यात आली होती. त्या प्रकरणात शिकार करणारा मुख्य आरोपी, प्राण्याचे मास आणून देणारा,आणि पार्टी करण्याकरिता हॉटेलमध्ये मास घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून,तिघेही कारागृहात बंदिस्त आहेत.प्राण्याच्या मासाची पार्टी करीत त्यावर ताव मारणारे सात आरोपी पोलिसांना चकमा देत होते.अखेर वन विभागाने पोलीस विभागाची मदत घेतली, आणि आरोपींचा शोध कार्य सुरु केले.हॉटेल मालक हा जामीन मिळविण्याकरिता धडपड करीत होता.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आरोपींच्या शोधात असताना,आरोपी घरी असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळताच,
रविवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून फरार असलेले आरोपी रमेश सदाशिव साठोणे यांना अटक करण्यात आली. तर तीन आरोपी सुद्धा पोलिसांना चकमा देत असताना सिद्धार्थ खोब्रागडे, दीपक कुंधारे व दिलीप उरकुडे या तिघांना सोमवारी अटक करण्यात आली. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.दोन आरोपींचा लवकर शोध घेतला जाणार असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर,वनपाल पी जी सयाम,वनपाल जी एस कावळे, वनरक्षक प्रशांत कनेरी,वनरक्षक श्रीमती आसोले,वनरक्षक श्रीमती धुर्वे व वाहन चालक अशफाक यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top