कारेगाव शेतातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेने २९,४६,१८०/ च्या मुद्देमाल केला जप्त

यवतमाळ/विवेक वानखडे (९८५०९७८९३३)
सणोत्सवाचा उत्साहाचे दिवस असताना शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जात असल्याची बातमी जनमाध्यम ने प्रकाशित केली असता आज पोलीस स्टेशन वडगाव जंगल हद्दीतील कारेगाव शेत शिवारात मोठ्या प्रमाणात उघड्यावर सर्रास जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली असता. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांना माहिती मिळाल्यावर पथकाने छापा मारून १६ संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून २९,४६,१८०/ रुपये च्या मालं हस्तगत करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अल्प कालावधीतच ग्राम कारेगांव शेत शिवारातील घटनास्थळावर पोहचुन गोपणीय माहिती प्रमाणे जुगार अड्डयावर छापा मारला असता आरोपी राजु दत्तुजी गिरी वय ४९ वर्षे, रा. दांडेकर ले आऊट यवतमाळ,अजय नारायण देशमुख वय ४९ वर्षे, रा. आठवडीबाजार यवतमाळ,विलास बळवंत भगत वय ४० वर्ष, रा. अंबानगरी घाटंजी, मेघराज भगवानप घागी वय २६ वर्षे, रा. वरुड ता. यवतमाळ,प्रतिक दत्तात्रय गंधारे वय २५ वर्षे, रा. वसंतनगर ता. घाटंजी, रवि महादेव विसमोरे वय ४२ वर्षे रा. इस्तारी नगर घाटंजी,अतुल विश्वास चव्हाण वय २४ वर्षे रा. घोटी ता. घाटंजी, चंदन आत्माराम पवार वय ३२ वर्षे रा. पारवा ता. घाटंजी शकिल शेख चाँद वय ३० वर्षे रा. पारवा ता. घाटंजी,सागर आनंदराव खाडे वय ३० रा. वरुड ता. यवतमाळ,संतोष आनंदराव मेश्राम वय ३६ वर्षे रा. सुकळी ता. यवतमाळ,सिद्धार्थ चरणदास रामटेके वय ३५ रा. शिवाजी वार्ड घाटंजी,तैयब शहा उस्माण शहा वय ४९ वर्षे रा. तारपुरा यवतमाळ, दिपक सुरेशलाल जयस्वाल वय ३८ वर्षे रा. वडगांव यवतमाळ, प्रमोद हुकुमचंद छाजेड वय ५० वर्षे रा. गिलाणी नगर यवतमाळ,मुसव्विरखान मनवर खान वय २८ वर्षे रा. बाभुळगांव यवतमाळ हे हारजितचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ५२ गंजीपा पत्ते जुगाराचे डावातील रोख २,००,३६०/ रुपये तसेच अंगझडतीत रोख ३,०१,८२०/ रुपये, असे एकुण ५,०२,१८० रुपये तसेच गुन्हयात एकुण जप्त मोबाईल व वाहने किं.अ. २४,४४,००० रुपये असा एकुण २९,४६,९८०/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपी कडून अधिक चौकशी केली असता सदरचा जुगाराचा अड्डा हा राजु दत्तुजी गिरी वय ४९ वर्षे, रा. दांडेकर ले आऊट यवतमाळ हा चालवित असल्याचे सांगीतले आहे. वरील नमुद सर्व आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन वडगांव जंगल येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोन, संतोष मनवर,धनराज हाके, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, सुभाष किणाके, आकाश सहारे सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या कारवाईनंतर इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतर अवैध धंद्यासहित शहरात इतरत्र सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top