जिल्ह्यतील चौसाळा येथील क्षञिय नवराञ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित भव्य वऱ्हाडी कविसंमेलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कविवर्य विठ्ठल कुलट यांच्या बहारदार सुञसंचालनात कविवर्य विजय सोसे,गौतम गुडधे यांनी कौटुंबिक,सामाजिक,शेतीमातीच्या कविता आणि खुमासदार विनोद निर्मिती करून रसिकांना हसता हसता लोटपोट केले.कविसंमेलनाला पुंडलिकराव वाट,शैलेश लोखंडे,अरूण काकड,मंडळाचे पदाधिकारी गावकरी आणि महिला भगीनी यांची हजारोच्या संख्येत उपस्थिती होती.