संत्रा व्यापारी तालीब खान यांचेवर प्राणघातक हल्ला

तालुक्यातीलच एका मोठ्या संत्रा व्यापाऱ्यांनेच कट रचल्याची चर्चा

वरुड – शहरापासुन काही अंतरावरच असलेल्या जे. के. अँग्रो इंडस्ट्रीज नामक संत्रा मंडीत थेट प्रवेश करून संत्रा व्यापारी सुमेल खान वहीदउल्ला खान यांचेशी ट्रॅक्टर भाडयाच्या पैश्यावरून वाद घालत त्यांचेवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना रात्री सात वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शेंदुरजनाघाट पोलीसांनी ८ ते १० लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करीत पुढील तपास करीत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, शहरातील शनिवार पेठ येथे वास्तव्यास राहत असलेले संत्रा व्यापारी सुमेल खान वहीदउल्ला खान हे वरुड ते तिवसाघाट रोडवर जे.के. अँग्रो इंडस्ट्रीज नामक संत्रा मंडी चालवितात. त्यांच्या संत्रा मंडीमध्ये शेतातुन संत्रा आणण्याकरीता भाडे तत्वावर इजहार बेग शिराज बेग मिर्झा रा. शेंदुरजनाघाट यांचा ट्रक्टर होता. इजहार बेग शिराज बेग मिर्झा याचेसोबत १ हजार ५०० रुपये ट्रीप प्रमाने पैसे द्यायची बोली झाली होती. एक आठवडा झाल्यावर पैशाचा हीशोब होत होता. त्याप्रमाणे २० आक्टोंबर ला सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान संत्रा व्यापारी सुमेल खान त्यांचे संत्रामंडीमध्ये हजर असतांना आरोपी इजहार बेग शिराज बेग मिर्झा हा पैसे घेण्याकरीता तेथे आला होता. एक आठवडा पुर्ण झाल्याने इजहार बेगच्या ट्रक्टरचा हीशोब द्यायचा होता. याचवेळी इजहार बेग याने हिशोबावरून सुमेल खान सोबत वाद घालत शिवीगाळ करने सुरु केले. आणी इजहार बेग हा मोठ मोठ्याने बोलु लागला तसेच पैसे पाहीजे नाहीतर मी येथून जाणार नाही असे बोलुन तो शिविगाळ करु लागला. व कोनाला तरी त्याचे मोबाईल वरुन फोन करून सांगत होता कि, माझे सुमेल खान यांच्या संत्रामंडी मध्ये भांडन झाले आहे तुम्ही लवकर येथे या असे बोलू लागला. मी त्याला परत म्हटले कि आपन बसुन पुन्हा हीशोब करु तर इजहार बेग हा अजिबात ऐकत नव्हता व जोरजारात शिविगाळ करीत होता. इजहार बेग ने फोन केल्यावरुन जे. के. अँग्रो इंडस्ट्रीज या संत्रामंडीमध्ये फैयाज, अशफाक, शेख इलियास उर्फ भोलु, शेख सोहेल शेख करीम, शेख मोनिष शेख अमिन व आजम तसेच त्यांचे सोबत इतर ३ ते ४ लोक सर्व रा.शेंदुरजनाघाट असे आले व त्यांनी सुमेल खान यांचेवर थेट विटा काठ्यांनी प्राणघातक हल्ला करीत कॅबीनची सुद्धा तोडफोक केली. तसेच प्लॅस्टिक कॅरेट व झाडु पोछ्याच्या दांडयाने मारहाण सुरू केली असतांना तेथील असलेल्या लोकांनी त्यांना अडविले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न सुद्धा केला. ऑफिसच्या काचेचे कॅबिन सुद्धा फोडले तेव्हा माझा लहान भाउ तालिब उर्फ कासिब खान याचे डोक्याला सुद्धा काचेचा मार लागला व पायाला सुद्धा मार लागुन तो गंभीर जखमी झाला यावेळी संत्रामंडी मध्ये काम करणाऱ्या मजुरांनी तालिब उर्फ कासिब खान याला त्यांचे तावडीतुन सोडविले. नंतर तालिब याला उपचारार्थ प्रथम वरुड ग्रामीण रुग्णालयात व तेथुन पुढील उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी इजहार बेग शिराज बेग मिर्झा, फैयाज, अशफाक, शेख इलियास उर्फ भोलू, शेख सोहेल शेख करीम, शेख मोनिष शेख अमिन, आजम त्यांचेसह इतर ३ ते ४ लोक सर्व रा. शेंदुरजनाघाट यांचे विरुद्ध संत्रा व्यापारी सुमेल खान वहीदउल्ला खान रा. शनिवारपेठ वरुड यांनी तक्रार दिल्यावरून शेंदुरजनाघाट पोलीसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध भादविचे कलम ४५२, ३२४, ३३७, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सतिश इंगळे यांचे मार्ग दर्शनाखाली शेंदुरजनाघाट पोलीस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top