पवित्र गंगाजलमध्ये होणार दुर्गा मातेचे विसर्जन

यवतमाळ–
श्री हिंदुस्थानी दुर्गादेवी मंदिर, आठवडी बाजार, यवतमाळ द्वारा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १५ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरु आहे. तसेच मंडळा तर्फे दुर्गा मातेच्या विसर्जना हरीद्वार येथून पवित्र गंगाजल आणण्यात आले आहे. सदर पवित्र गंगाजल टॅन्कर द्वारा दि.२२ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता पासून मिरवणूकीद्वारे बँड पथकासह महादेव मंदीर येथून निघून तहसिल चौक ते शनी मंदीर चौक ते दुर्गा माता आठवडी बाजार येथे मिरवणूकीचे समापन होवून विसर्जनाकरीता पवित्र गंगाजल देवीच्या मंदीरात ठेवण्यात आले आहे.
तसेच दि. २३ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी १ वाजता पासून दुर्गा मातेचे विसर्जन कार्यक्रम सुरु होईल. सदर दुर्गा विसर्जनाची मिरवणूक देवी मंदीर पासून आठवडी बाजार ते शनी मंदीर चौक ते न. प. लालबहादुर शास्त्री मार्केट ते राणी झांसी चौक स्केअर ते जयभारत चौक, डॉ. यादव यांचे घरा पासून दुर्गा माता मंदीर, आठवडी बाजार मंदीर परिसरात येवून मातेची मुर्ती जलकुंड मध्ये विसर्जीत करण्यात येईल. याच जलकुंड मध्ये पवित्र गंगाजल टाकून पवित्र गंगाजल मध्ये मातेचे विसर्जन होणार आहे. अशी माहिती श्री. हिंदुस्थानी दुर्गा देवी मंदीर आठवडी बाजार, यवतमाळ तर्फे विश्वस्तांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top