जलसंपदा विभागातच्या ४२९ अभियंत्यांना आ.बच्चू कडूमुळे मिळाला न्याय …

अचलपूर-

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदाकरीता २०१९ मध्ये सरळ सेवा परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या . या एकत्रित स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालावर आधारित राज्य स्तरीय निवड समिती पुणे यांनी ४९५ पात्र उमेदवाराची कागतपत्र तपासून शिफारस सुद्धा केली होती . तरी सुद्धा या पात्र ठरलेल्या उमेदवाराना नियुक्तीपत्र देण्यास दिरंगाई केली जात होती . या बाबत राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू यांनी संबंधित विभागाला पात्र देऊन याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची वेळोवेळी मागणी केली होती . ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत तीन वर्ष उलटूनही कारवाई होत नसल्याने अनेक उमेदवारांनी आ. बच्चुभाऊ कडू यांच्या कडे तक्रार केली .आणि सामना कराव्या लागणाऱ्या समस्या मांडल्या .यावर आ. बच्चुभाऊ कडू यांनी १५ सप्टेंबर रोजी जलसंपदा विभागाला नोटीस देऊन २६ ऑक्टोबर पूर्वी पात्र उमेदवारांना नियुक्ती न दिल्यास विद्यार्थ्यांसोबत १२ ऑक्टोबर रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता .या इशाऱ्याला अनुसरून जलसंपदा विभागाने २० ऑक्टोबर रोजी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय १११८ अन्वये ४९५ पात्र उमेदवारापैकी ४२९ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले . यामुळे आ. बच्चुभाऊ कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असणारे आ. बच्चुभाऊ कडू यांनी आंदोलन ,उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला .आणि पुन्हा या नियुक्तीमुळे लोकनायक आ.बच्चुभाऊ कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top