स्काऊट्स गाईड पथकाची स्वच्छता मोहीम

अकोट-

सेवा पंधरवडा अंतर्गत श्री शिवाजी विद्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी शाळा परिसर तसेच शहरातील मुख्य चौकात स्वछता करण्यात आली. स्वछता ही सेवा पंधरवडा अंतर्गत शहरातील सोनू चौक,जयस्तंभ चौक या ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात आली.तद्नंतर शहरात प्रभातफेरी काढत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती चा संदेश दिला. या कार्यक्रमाला स्काऊट्स सहाय्यक जिल्हा आयुक्त विजय जीतकर, प्राचार्य संजय वालसिंगे, गाईड कॅप्टन वृंदा रेंधे, स्काऊटर संदीप पवार,पर्यवेक्षक अंजली सपकाळ, सुभाष चौधरी, प्रदीप नागरे, एन सी सी पथक तसेच शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top