भारतीय जनता पार्टी मोर्शी तर्फे महाविकास आघाडीचा निषेध

मोर्शी-

स्थानिक तहसील कार्यालयासमोर आज २१ ओक्टोम्बर रोजी खाजगी नोकर भरतीच्या संदर्भात जे चुकीचे वातावरण महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले. त्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे निदर्शने व नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील वेळोवेळी घेण्यात आलेल्या निर्णयाचा सुद्धा पर्दाफाश केला. या संदर्भातील माहिती सुद्धा उपस्थितांना देण्यात आली.व प्रचंड जयघोषात भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

.यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोर्शी तालुकाध्यक्ष निलेश शिरभाते, भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, संजय घुलक्षे,दत्ताभाऊ गेडाम,नितीन राऊत,सुनील ढोले,ज्योतिप्रसाद मालवीय,हर्षल चौधरी, मनोहरराव शेंडे,रवी मेटकर,अशोकराव देशमुख,नितीन चिखले, राजेश गजबे,नितीन धोटे,प्रतिभाताई राऊत, भारतीताई महाजन, अजयजी साबू, रावसाहेब अढाऊ, बाबाराव जाधव,संगीता तायडे,अनिताताई लांजेवार,कोमलताई पारडे,सुनंदाताई लाडविकर,मनोज लांजेवार,सचिन राजगुरे,अंकुश धावडे, सचिन लुंगे,रुपेश ढोले, प्रशांत राऊत,शरद काटोलकर,हरीश वैराळे,अजय लोयटे, अंकुश धावडे यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top