सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळ विसर्जन निमित्त….

सरमसपुरा पोलीस स्टेशनची शांतता समिती बैठक

अचलपूर –
सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळ विसर्जन निमित्त सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत जगदंब महाविद्यालयामध्ये सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.यावेळी जगदंब विणकर संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकर,प्रदीप पाटील , सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जाधव,बाळासाहेब गुलक्षे,कबीर हनफी आदी मान्यवर उपस्थितीत होते . सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात १४ व ग्रामीण भागात १७ असे एकूण ३१ सार्वजानिक दुर्गा मंडळामध्ये दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून त्याचसोबत ७ शारदा मंडळामध्ये शारदा देवीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत सार्वजनिक दुर्गा मंडळ ची विसर्जन मिरवणूक संदर्भात वेगवेगळ्या बाबीवर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सर्वांनी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून सर्व नियमाचे पालन करून शांततेत हा उत्सव साजरा करण्याचे आव्हान केले .यावेळी विनय चतुर ,बाळासाहेब गुलक्षे,रमाकांत शेरकर यांनी मत व्यक्त केले . यावेळी सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळाचे सदस्य , पदाधिकारी,प्रफुल कुकडे ,सुदर्शन झोड,नितीन डकरे,खुपियाचे सुधीर काळे आदी उपस्थितीत होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top