अकोट पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन

अकोट:-
मानव समाज वतीने अकोट पोस्ट ऑफिस मध्ये जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. टपाल दिनानिमित्त कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आली. पोस्ट कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. पोस्ट कार्यालय परिसर कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छ करुन यावेळी टपाल दिन साजरा करण्यात आला.
युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४साली स्थापना झाली होती. १९६९पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे हा दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. अनेक देशात यानिमित्ताने पोस्टल विक पाळला जातो.
भारतीय डाक विभाग आता फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा मार्फत ग्राहक पोस्टाशी जोडले जात आहेत. कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला.
लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून पैशांची इतर बँकेच्या आपल्या खात्यातून उलाढाल केली. यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांची जबादारी वाढली असून येत्या काळातही पोस्ट सर्वोत्तम सेवा देण्यास सज्ज असेल अशी ग्वाही उपपोस्ट मास्टर अजय भगत कर्मचाऱ्यांनी दिली.
या कार्यक्रमाला मानव समाज चे अध्यक्ष सुरेश सेजपाल,सचिव विजय जितकर, सदस्य राजकुमार भगत व अन्य सदस्यांनी उप पोस्ट मास्तर अजय भगत, शैलेश चव्हाण, किशोर ताडे,पंकज सावरकर,कु. पूजा वसू, श्रीमन मीना, पी.जी देशमुख, शरद मुऱ्हेकर, गजानन नगराळे, अमोल लहाने, प्राची गणोरकर, एस एस दामधर, आकाश तेलगोटे, वैभव पाचकवडे, पी.एस गासे आदी उपस्थित कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top