भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित

यवतमाळ –
भारतीय जनता पक्षाचा यवतमाळ जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घोषणा केली असून या कार्यकारणी ४ सरचिटणीस, १० उपाध्यक्ष, १० सचिव यांच्यासह विविध आघाड्याचे जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे या कार्यकारणी मध्ये पहिल्यांदाच महिला व अनुसूचित जमातीच्या कार्यकर्त्यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी या कार्यकारणीत महिलांचा विशेष संधी देण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी व सर्व आघाड्यांमध्ये पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने सक्रिय व नव्या दमाचा कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत चा प्रयत्न या कार्यकारणी मध्ये करण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आगामी कार्यक्रम राबविण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक उपयोगी योजना घरोघरी पोहोचवणे व प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याची मजबूत फळी करण्याचा प्रयत्न करणार ही कार्यकारणी संघटन मजबुत करणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top