घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान

घाटंजी–
तालुक्यातील चोरंबा येथील तूकाराम राऊत यांच्या घरी त्यांची म्हातारी पत्नी कालावतीबाई तुकाराम राऊत हिने सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस लावला असता गॅस सिलिंडर लीक असल्याने अचानक पेंट घेतला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु तुकाराम राऊत आणि कलावती राऊत ही म्हातारी दाम्पत्य आपल्या मुलांपासून अलग राहून आपल्या जीवनाचा गाडा चालवीत होते त्यांच्या जीवनाचा गाडा आनंदाने चालत असताना आज काळाने होत्याचे नव्हते झाले यात गॅस सिलिंडर लीक होण्यास गॅस एजन्सी जबाबदार असल्याचे गावकऱ्यातून बोलल्या जात आहे गॅसने इतका भयंकर पेट घेटला कि संपूर्ण रूममध्ये आगच आग दिसत होती. त्यामुळे घरातील महत्वाचे सामान आणि घरात ठेऊन असलेले रुपये घराबाहेर सुखरूप काढणं घरच्याना आणि गावातील लोकांना कठीण झाले आणि घरातील पूर्ण सामान,घरात असलेले ९० हजार रुपये, गहू तांदूळ, किराणा सामान दिवाण, व त्यावरील गादी दरवाजे खिडक्या आणि महत्वाचे कागद पत्रे जसे आधार कार्ड,पॅन कार्ड,बँकेचे पासबुक, मतदान कार्ड गॅस सिलेंडरचे पुस्तक व पैसे पूर्ण जळून राख झाले. कलावती बाईने घरात आग लागल्याबरोबर आरडा ओरडा केली असता गावातील लोकांनी घरात रुद्ररूप धारण केलीली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आपापल्या घरून पाणी आणून आग विझविण्यात गावकर्यांना यश आलं परंतु घरातील महागडे सामान आणि घरात असलेले ९० हजार रुपये आगीत जळण्यापासून वाचवू शकले नाही तुकाराम डोमाजी राऊत यांची संतोष राऊत,गजानन राऊत, संजय राऊत, हे तीन मुल असून कलावती आणि तुकाराम हे दोन्ही म्हातारे दाम्पत्य मुलांपासून अलग राहत असल्याने त्यांची गॅस सिलिंडरच्या लिकमुळे जे नुकसान झाले आहे ते लखमाई इंडीयन गॅस एजन्सी घाटंजी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नुकसानग्रस्त कलावतीबाई आणि तुकाराम राऊत यांनी मागणी केली आहे.


लखमाई इंडीयन गॅस एजन्सी कडून कोणत्याही प्रकारची घरगुती गॅसची कधीही तपासणी केली जात नाही. त्याचा परिणाम म्हणून असे प्रकार घडत असल्याचे आरोप गावकरी आणि नुकसानग्रस्त महिलेनी केला आहे.

कलावतीबाई आणि तुकाराम यांनी एकमेकांच्या चोरीने घरात पैसे लपवून ठेवले होते कलावतीने ४० हजार रुपये आणि तुकाराम यांनी मध्यवर्ती बँकेतून पीक कर्ज उचलून आणलेले ५० हजार रुपये कलावती बाईला न सांगता घरातील दिवाना खाली ठेवले होते ते आज आगीत जळून खाक झाल्यानंतर ते दोघे दाम्पत्य एकमेकांना सांगून ठाहो फोडीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top