आगेत खाक झालेल्या कुटुंबाला आ. रवी राणांचा मायेचा हात

सर्व दौरे रद्द करून आ.राणांनी केली आर्थिक मदत

अमरावती –
बेलपुरा या भागात असणारे दुबेकर कुटुंबावर 20 ऑक्टोंबर रोजी दुःखाचा डोंगर कोसळला त्यामागचे कारण म्हणजे दुबेकर कुटुंब हे बेलपुरा येथील रहिवासी असून दुबेकर कुटुंबाचे परिस्थिती ही अतिशय हालाखीची , मोलमजुरी करून आपले कुटुंब चालविणारे पुष्पा बबन दुबेकर,बबन देविदास दुबेकर व त्यांचा मुलगा अलोक असा परिवार आहे.
अशातच त्यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सर्व घर आगेत नष्ट झाले असता कुटुंबातील एका सदस्याने आमदार रवी राणा यांना भ्रमणधौरीवरून संपूर्ण माहिती दिली असता आमदार राणा हे आपल्या विकास कामाच्या दौऱ्यात व्यस्त असून सर्व दौरा रद्द करीत घटनास्थळी पोहोचले आमदार राणांना बघून घरातील महिला यांनी जोरजोराने रडण्याचा टोह दिला. आपल्या कुटुंबातील एका सदस्याला ज्याप्रमाणे सांगतो त्याचप्रमाणे आमदार राणांना सुद्धा त्यांनी आपली आपबीती पूर्ण परिस्थिती सांगितली आमदार राणा यांना गरिबांच्या परिस्थितीची जाणीव असून त्यांच्याकडून राहायला गेले नाही तर त्यांनी मायेचा हात फिरवत जागेवरच दहा हजार रुपये नगद 10000. रक्कम कुटुंबियांना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top