जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ कार्यालयावर मोर्चा

विविध संघटनांच्या वतीने निवेदन

यवतमाळ –
जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ यांचे कार्यालयावर २०ऑक्टोबर रोजी खरडगाव ता.नेर येथील पंकज दुर्योधन करडे यांना चार आरोपींनी घातपात करुन मारल्या प्रकरणी खरडगांव व परीसरातील गावातील सर्व समाजाचे शेतकरी ,गावकरी,मित्र मंडळी व सकल धनगर समाज यवतमाळ जिल्हा यांचे वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी, यवतमाळ पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ या तीनही कार्यालयावर भव्य संख्येने मोर्चा काढुन चवथा आरोपी मुकुंद गावंडे याला राजकीय पाठबळाच्या भरवश्यावर त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नसून उजळ माथ्याने मोकाट फिरत आहे. त्याला त्वरीत अटक करावे, शासकीय सेवेतील आरोपींना सेवेतून बडतर्फ करणे, पंकज करडे च्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेणे व त्याचे कुटुंबास शासकीय अर्थीक सहाय्य त्वरीत मिळणे या मागणी करण्यात आल्या.
मा. जिल्हाधिकारी व अति.पोलीस अधिक्षक यांनी त्वरीत कार्यवाही चे आश्वासन दिले. तसेच म.रा .वितरण कंपणीचे अधिक्षक अभियंता यांनी लिखीत स्वरुपात बडतर्फ करण्यात येईल. तसेच शासकीय स्तरावरून कार्यवाही पूर्ण करुन त्वरीतच शासकीय सेवेत कुटुंबातील एकास सामाऊन घेणे व नियमाप्रमाणे आर्थिक लाभ मिळवून देण्याचे लिखीत स्वरुपात पत्र दिले. मोर्च्यात मोठ्या संखेने महिला व पुरुष मंडळी ठाण मांडून होती. मोर्चाचे यशस्वी नियोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मुंबई जिल्हा शाखा यवतमाळ चे वतीने करण्यात आले होते.
यावेळी सर्व उपस्थीतांनी मागण्या मंजूर न झाल्यास याही पेक्ष्या तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाची यशस्वी सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top