प्रबोधना सोबत गाजले हास्य कविसंमेलन

हास्य कवि संमेलनाला विनोदी कथाकार नरेंद्र इंगळे , कवी विलास ठोसर , गझलकार चंद्रकांत महाजन , कवयीत्री स्वाती महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करून करण्यात आले. कवी विलास ठोसर यांनी काही विनोदी किस्से सांगत शेतीमातीच्या निळ्या अभाळी या रचनेने कवी संमेलनाची सुरवात केली. तसेच त्यांनी प्रबोधनपर रचने सोबत झुरनी, लेकं या रचनांनी रसिकांचा मनाचा ठाव घेतला.
प्रमुख अतिथी गुल्लेरकार यांनी आपल्या वर्‍हाडी विनोदी शैलीत हास्य फुलवले. किस्से व कथा सांगत रसिकांना लोटपोट केले. तसेच आपल्या संबोधनात उपस्थितांना प्रबोधनात्मक मोलाचा संदेश दिला. कवी गझलकार चंद्रकांत महाजन यांनी आपल्या बहारदार कविता व गझलेलेने मंत्रमृग्ध केले. त्यांच्या रस्ते या कवितेने रसिकांना हसविले.
तसेच कवयित्री स्वाती महाजन यांनी स्त्री जागरूकते वरील बहारदार रचना सादर केली. कवि संमेलनात कवींनी प्रबोधन व मनोरंजना सोबत काव्य ,कथा, हास्य विनोदातून कार्यक्रमात रंगत भरली. रसिक प्रेक्षक लोटपोट झाले. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. कार्यक्रमाचे आयोजन शारदादेवी महिला मंडळाच्या वतीने हास्य कवीसंमेलनाचे आयोजन सरस्वती नगर ,अकोट येथे करण्यात आले होते . कार्यक्रमाचे संचालन व स्वागत परिचय धर्मे व वंदना गोगटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रिया बेरार हिने केले. हास्य कविसंमेलना आयोजना साठी धर्मे, संजय गोगटे, ठाकरे ,पप्पू बेरार, गुड्डू बेरार,अस्वार यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top