सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील स्टॉलला आग : मोठी दुर्घटना टळली

सिग्नलिंग कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने विझवली आग

वर्धा जनमाध्यम– वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. ४ वर रिलये रूमच्या लागुन असलेल्या मल्टीपर्पज स्टॉलला अचानक पहाटे चार वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने रौद्ररूप घेत स्टॉलला आपल्या कवेत घेतले. सिग्नलिंग कर्मचाऱ्यांना आगीचे लोळ दिसताच त्यांच्या तत्परतेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी एस अँड टी कडे असलेल्या अग्निशामक यंत्रणेच्या साह्याने कर्मचारी अहफाज पठाण. राजेश ढोबे यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला..तात्काळ वर्धा नगरपालिकाचे अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले. त्यानंतर स्टॉलला लागलेली आग आटोक्यात आणून बाजूच्या रिलये रूम ला आगीपासून वाचविण्यास यश आले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती यापूर्वी इटारसी रेल्वे स्थानकावर अशी घटना घडली होती. याची पुनरावृत्ती सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर घडली असती मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना टळली. घटनेची माहिती मिळताच नागपूर येथील डीआरएम सहित अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top