पोस्टर लावणाऱ्या तीन युवकांना ट्रकने चिरडले

एकाचा जागीच मृत्यू दोन गंभीर;आज पहाटेची घटना

वर्धा जनमाध्यम : ओडिसा येथील तीन युवक शहरातील निर्मल बेकरी चौकात पोलवर बॅनर लावत असताना भरधाव ट्रकने या तिघांना चिरडले त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले ही घटना मंगळवारच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली, सुनिल बेहरा (१९) रा. मैदानकाल ओडिशा हा युवक जागीच ठार झाला. तर उरदानंद बेहरा, राजेश बेहरा. गंभीर जखमी झाले असून यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे, हे तिघेही ओडिशा राज्यातील रहिवासी असून ते वर्ध्यात होत असलेल्या जादुगार शो चे बॅनर लावण्याचे काम करीत होते. ७ पासून कार्यक्रम आयोजित असल्याने हे तिघेही मोटरसायकल क्र.ओ आर ०४ एटी ७२५७ यावर उभे होऊन निर्मल बेकरी चौकातील पोलवर बॅनर लावत असताना भरधाव ट्रक क्रं.यु पी ७५ एटी ०२०३ ने तिघांनाही चिरडले या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळा वरून पळ काढला.घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली..पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top