जि.प. प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा मृत्यू

दोन दिवसापासून शव क्वार्टर मध्येच…

लेहेगाव/वार्ताहर
येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा तिरपुडे यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार ३० रोजी सकाळी ८च्या सुमारास ही घटना उजेडात आली. डॉ.सुषमा तिरपुडे हा एकट्याच आपल्या क्वार्टर वर राहत होत्या . मागील दोन दिवसांपासून त्या फोन उचलत नाही म्हणून चंद्रपूरच्या त्यांच्या एका पोहरकर नामक मित्राने नेर पिंगळाई गावातील डॉक्टरांच्या फोन नंबरचा इंटरनेटवरून शोध घेतला. त्यामध्ये एका खाजगी डॉक्टरांचा नंबर त्यांना मिळाला असता त्यावर फोन करून डॉ.सुषमा दोन दिवसापासून फोन उचलत नसल्याचे सांगितले व चौकशी करून कळवण्याचे सांगितले. या फोन नंतर गावातील खाजगी डॉक्टरांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन चौकशी केली असता तेथील कर्मचार्‍यांनी डॉक्टर क्वार्टर झोपलेल्या आहेत असे सांगितले, यावरून खाजगी डॉक्टरांनी त्यांचा दरवाजा वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही, त्यानंतर या क्वार्टरची खिडकी उघडून आत मध्ये बघितले असता डॉक्टर सुषमा यांचा मृतदेह हा बेडवर पडून असल्याचे व दुर्गंध पसरलेले त्यांना दिसला. यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनला नेर पिंगळाईचे पोलीस पाटील राजेश राऊत यांनी माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्वार्टरचे दरवाजे आतून बंद असल्यामुळे पोलिसांना दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करावा लागला.
यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली होती,मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा शव चिकित्सक गृहाकडे रवाना करण्यात आला. डॉक्टरांचा मृतदेह दोन दिवसापासून पडून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे .मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची नोंद पोलिसां तर्फे घेण्यात आलेली आहे. या घटनेचा तपास सचिन लुले ठाणेदार पोलीस स्टेशन शिरखेड यांच्या मार्गदर्शनात मनोज कळसकर हेट कॉन्स्टेबल, निलेश देशमुख हेट कॉन्स्टेबल, पंकज चौधरी पोलीस कॉन्स्टेबल,यश गुडधे .पोलीस कॉन्स्टेबल यांच्यातर्फे सुरू आहे .

आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार उघड-
नेर पिंगळाईचे आरोग्य केंद्र परीसरातील मोठे आरोग्य केंद्र असून या केंद्रातून २४ तास सातही दिवस सेवा देण्याची यंत्रणा आहे. या आरोग्य केंद्रातील अधिकारी असणार्‍या , महिला डॉक्टर दोन, दिन दिवसापासून कामावर हजर नाही ,त्यांनी हजेरी पटावर उपस्थिती नाही. या बाबत एकही कर्मचार्यला माहिती कशी नाही? त्यांना दोन तीन दिवसपासून कुणीही परिसरात पहिले नाही तरी कर्मचार्यांनी या बाबत आपल्या वरिष्ट कार्यालयाला कळवले का नाही? हाकेच्या अंतावर असलेलेया डॉक्टर सुषमा तिरपुडे यांच्या क्वार्टर वर जाऊन पाहण्याची तसदी कुण्याही कर्मचार्यांनी का घेतली नाही? मृतदेहाचा परिसरात दुर्गंध पसरलेला असताना सुद्धा आपल्या सहकारी कर्मचार्याची साधी चोकशी सुद्धा का केली या वरून या आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे व तशी चर्चा नेर पिंगळाई कर नागरिक करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top