वैशाख वणवा आणि बेपत्ता सावली

रस्ते सिमेंटीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कटाई

अमरावती/प्रतिनिधी
नवतपाच्या पाच दिवसानेतर शहरातील तापमान ४५अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जीवाची काहिली होत असून रस्त्यावर जाणार्‍या पादचार्‍याला किंवा वाहन चालकांना सावलीचा सहारा घ्यावा लागतो. पण, रस्ता सिमेंटीकरण व रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आल्याने `सावलीच बेपता’ झाली आहे.
सध्या वैशाख महिना सुरू आहे. वैशाखात तापमान दरवर्षीच वाढत आहे.परंतू यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला आहे. देशभरात तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे तर महाराष्ट्रासह विदर्भात हीच परिस्थिती कायम आहे. गेल्या पंधरवड्यापासून अमरावती शहराचे तापमान देखील ४५ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे. याला कारणीभूत घटक म्हणजे सिमेंटीकरण व रुंदीकरण्याच्या नावाखाली होत असलेली वृक्ष कटाई. वाढत्या सिमेंटी करणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरल्या जात नाही व त्यामुळे सिमेंटचे रस्ते उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तापतात. तसेच या कामाकरिता होत असलेली झाडांची कटाई.
अमरावती बडनेरा या दहा किमी रस्त्यावरीचे सिमेंटीकरण काही ठिकाणी झाले तर कोठे सुरू आहे. सिमेंटीकण करण्याकरिता रस्त्यावरील झाडे कापल्या गेलीत. हा रस्ता अमरावती व बडनेरा शहराला जुळल्या गेल्यामुळे वाहनांची गर्दी २४ तास राहते. त्यामुळे रस्त्यावरील पादचा-यांंना व वाहनधारकांना भर उन्हात हे अंतर कापावे लागते. अशीच अवस्था बडनेरा अमरावती जुना बायपासची आहे. याही रस्त्यावर सतत गर्दी राहते. सध्या या रस्त्यावर उड्डान पूलाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या आजूबाजुची झाडे तोडण्यात आली. त्यामुळे येथील वाहनधारकांची अवस्था तशीच आहे. या रस्त्याबरोबर शहरातील इतर रस्त्यांची स्थिती हीच कायम असल्यामुळे सावली शोधूनही सापडत नाही.
झाडांमुळे सावली सह ऑक्सिजन मिळतो हे प्रत्येकालाच माहीत असताना त्याचबरोबर करोना काळात याचे महत्त्व कळले असतानाही शहर विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्ष कापण्यात आलेली आहे. मात्र झाडे पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा लावण्याचे सौजन्य कोणीही दाखवत नाही.प्रत्येकाने वृक्षाचे संवर्धन केल्यास सावलीसह ऑक्सिजन प्रत्येकालाच मिळेल.


संत तुकारामांनी `वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या भजनातून वृक्षाचे महत्त्व पटवून दिले आहे. पण, आज शहरातील झाडांची होत असलेली कटाई या भजनाला तिलांजली देत आहे.

पर्यावरण संवर्धनाचा गवगवा करणार्‍या विविध संघटना रस्त्यावर होत असलेली वृक्षकटाई बाबत बोलण्यास तयार नाही.

काही हौसे-नवसे-गवसे वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतात पण त्याचे संवर्धन होत नसल्यामुळे ही झाडे जागीच वळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top