ग्रामिण वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन

मध्यस्थी मंडळाचा विशेष उपक्रम

आकोट-
ग्रामिण मुला मुलींचे विवाह योग सहज आणि सुलभतेने जुळवून यावेत त्यासाठी मध्यस्थी मंडळाचे विवाह विषयक उपक्रमात त्यांना सहभागी करुन घेण्यास्तव अकोला अमरावती जिल्ह्यातील ग्रामिण शेतकरी ,व्यवसायी कुटुंबातील उपवर युवक युवती व त्यांचे पालकांचा मेळावा येत्या १० डिसेबरला येवदा(ता.दर्यापूर ) येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.

अकोट दर्यापूर मार्गावरील येवदा येथील गंगोत्री मंगलम् येथे आयोजित ग्रामिण मेळाव्याला युवक युवती व त्यांचे पालकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी केले आहे. या मेळाव्याला समाज धुरीणांसह संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था या पालक संस्थेचे विश्वस्त उपस्थित राहणार असून हा मेळावा मध्यस्थीच्या अमरावती शाखेच्या विद्यमाने तथा गंगोत्री मंगलम् चे संचालक निवृती बा.च-हाटे व नितिन सु बढे यांचे विशेष योगदानातून पार पडणार आहे. मेळाव्याला उपस्थित युवक युवतींच्या नोंदणी शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.
दुसरे सत्रात पुनर्विवाह करु इच्छितांचा परिचय मेळाव्यातील दुस-या सत्रात पुनर्विवाह करु इच्छित घटस्पोटीत, परित्यक्ता, विधवा,विधूर आणि वयस्क युवक युवतींना आपला परिचय देता येईल.संबधीत युवक युवती व त्यांचे पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे असेही सुचित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top