संविधान दिनाचे औचित्य साधून सत्कार सोहळा

अकोट/प्रतिनिधी
स्थानिक भीम नगर खानापूर वेस्ट भीम ज्योतबुद्ध विहार येथे संविधान दिनाचे औचित्य साधून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समता युक्त समाज रचनेसाठी व समाजाच्या उत्कर्षासाठी आणि संपूर्ण समाज एकरूप राहावा स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या विचार या विचारधारेच्या प्रवाहात राहून समाज सतत कार्यरत राहून याकरिता बुद्ध धम्म प्रसारक मंडळ भिमनगर खानापूर जकोट नेहमी विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक समाजासमजोपयोगी कार्यक्रम राबवित असते. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ज्या कर्तुत्वान व्यक्तींनी न्याय प्रविष्ट असलेले बुद्ध विहार संबंधी सतत सहा वर्ष लढा देऊन यश संपादन केले. त्याप्रीत्यर्थ सत्कार समारंभ करून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनोहर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून अजय घनबाजू, अकोट ही रा गवळी साहेब तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तसेच माजी प्राध्यापक, प्रमोद वानखडे साहेब अकोला हे होते. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून एडवोकेट डी एस वानखडे अकोला, मा श्री ईश्वर इंगळे साहेब इंजिनिअर अकोट एडवोकेट बी आय दं दि साहेब अकोला या मान्यवरांचा सत्कार सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक आदर्श विद्यार्थी वस्तीगृह गेली 73 वर्षापासून सुरळीत चालवल्याबद्दल पंजाब तेलगोटे यांचा सत्कार करण्यात आलासंपूर्ण बुद्ध विहार आपल्या मेहनतीने विचाराने कैलास तेलगोटे यांनी बांधकाम केल्याबद्दल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व समजून सांगितले. याप्रसंगी राजेंद्र तेलगोटे यांनी संविधान पर गीत गाऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज श्यामस्कारव संचालन विजय निकाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर तेलगोटे यांनी केले याप्रसंगी शहरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून संवि तेधानाचे महत्त्व समजून घेतले. या कार्यक्रमाला बुद्ध धम्म प्रसारक मंडळ यांनी चांगल्या परीने व्यवस्था करून कार्यक्रम पार पडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top