खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या वर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा

भाजपा अचलपूर शहर व ग्रामीणची वतीने मागणी

अचलपूर (प्रतिनिधी)- राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी दगड फेक केल्याचा घटनेचा निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अचलपूर शहर व ग्रामीण तर्फे हल्लेखोराला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आज अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे .तसेच या घटनेचा निषेध ही भाजपा अचलपूर शहर व ग्रामीण तर्फे नोंदविण्यात आला आहे .यावेळी भाजपा पक्षाचे शहराध्यक्ष कुंदन यादव,भाजपा पक्षाचे ओबीसी प्रदेश सरचिटणीस गजानन कोल्हे , भाजपा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, अचलपूर विधानसभा प्रमुख प्रवीण तायडे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती विनिताताई धर्मा , सरचिटणीस अचलपूर शहर शंकर भाषांनी , दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष निलेश नागापुरे , रुपेश लहाने , राजेंद्र जयस्वाल , माजी नगरसेवक अभय माथने , विजय मांडले , संदीप पाचगरे , ललित ठाकूर ,मनीष समंद , योगेश थोरात , प्रफुल कुऱ्हेकर, प्रफुल बर्वे , बिजवे भाऊ , अभय शेंगर ,गौरव रघुवंशी , मनोज कहाते व भाजपा पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top