अखेर कोरोना काळातील त्या विद्यार्थ्याना पदवी व पदव्युत्तर शिक्षण पर्यंत …

संपूर्ण शिक्षण शुल्क माफीचा २०२१ मधील निर्णयाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित

त्या असंख्य विदयार्थी वर्गात आनंदाचे वातावरण …

अचलपूर (प्रतिनिधी)- कोवीड -१९ पादूर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत संपूर्ण शुल्क माफी देण्याबाबत २०२१ रोजी निर्गमित शासन निर्णयाची अंमलबजावणी संदर्भात उच्च शिक्षण संचालनालय,पुणे महाराष्ट्र राज्य तर्फे (गाईडलाइन्स) मार्गदर्शक सूचना १७ नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आली आहे . यासंदर्भात अमरावती शहराच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना राज्यसभेचे खासदार व भाजपा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली होती . राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने राज्यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील , राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोविड – १९ च्या पादूर्भावामुळे राज्यात ज्या विद्यार्थ्याचे आई,वडील किंवा पालक यांचे निधन झाले आहे अश्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२१ रोजी अश्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षनापर्यंत संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला होता . सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित न झाल्याने सत्र २०२३-२४ मध्ये सर्व अकृषी विद्यापीठ मध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्याना संपूर्ण शिक्षण शुल्क भरावे लागले.यामुळे राज्यातील असंख्य विद्यार्थी लाभापासून वंचित असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अंकुश घुलक्षे यांनी राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या समक्ष हा विषय मांडला .याची तत्काळ दखल घेऊन राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील , विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव , अतुल खानोलकर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा व चर्चा केली .आणि १७ नोव्हेंबर रोजी उच्च शिक्षण संचालनालय ,पुणे येथून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठासाठी कोविड १९ पाश्र्वभूमीवर विविध शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे पत्र निर्गमित केले . यामध्ये नमूद केले आहे की , ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचे आई ,वडील ,पालकाचे कोविड १९ पादुर्भावामुळे निधन झाले असतील अश्या विद्यार्थ्यांचे / विद्यार्थिनीचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होई पर्यंतची संपूर्ण फी करण्यात यावी ,अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे विविध शुल्क माफ करणे आणि विविध मुख्य मुद्द्याचा समावेश आहे . यापूर्वी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ न मिळता पूर्ण आर्थिक शुल्क भरावे लागत असताना आता मात्र या योजनेचा लाभ होणार असल्याने त्या असंख्य विदयार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.एकीकडे कुटुंबाची आर्थिक स्थितीत नाजूक असल्याने विद्यार्थ्याना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता.आता या निर्णयामुळे या विद्यार्थ्याचा उज्वल भवितव्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे यात शंका नाही .कोरोना काळात कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असताना असंख्य कर्ता पुरुषाचा निधन झाले .यामुळे या कुटुंबातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महागडे शिक्षण शुल्क भरायचे तरी कसे ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यासंदर्भात राज्य शासन स्तरावर भाजपा पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी हा महत्वपूर्ण विषय अनेक वेळी मांडला .यानंतर विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव , अतुल खानोलकर यांनी मुंबई ,पुणे येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रव्यवहार केले .आणि या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला.राज्यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे भाजपा पक्षांचे राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी हा गंभीर प्रश्न रेटून धरल्याने संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्याना मोठा लाभ मिळाला आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top