Author name: Admin

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मोटरसायकल रॅली व सभेच्या अफाट गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले नौटंकीबाजांना घरचा रस्ता दाखवा- आ. यशोमती ठाकूर अमरावती/प्रतिनिधी अच्छे दिन च्या नादात दहा वर्षात देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार,वंचित आणि शोषितांची घोर फसवणूक भाजप सरकारने केली आहे.आज अमरावती जिल्हा राणा दाम्पत्याने दहा वर्षे मागे आणून टाकलाय त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना,बेरोजगारांना आता न्याय देण्यासाठी शेतीमातीशी जुळलेला आपला …

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल Read More »

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल

प्रकृतीबाबत रुग्णालयाने दिली मोठी अपडेट पुणे – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पुणे शहरातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आणि छातीत जंतुसंसर्गामुळे त्यांना त्रास होऊ लागला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुविधेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. प्रतिभाताई पाटील यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप आणि छातीत संसर्गाची तक्रार …

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल Read More »

‘आयुष्याच्या उंबरठ्यावर’ ही संकल्पना घेवून महिला दिन साजरा

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात आयोजन अमरावती/ का.प्र.‘आयुष्याच्या उंबरठ््यावर’ ही संकल्पना घेवून मनपा लायन्स क्लब व जेसीआय इंद्रपुरीच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.महापालिकेचे महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे व प्रकल्प अधिकारी दिगंंबर तायडे यांनी महाविद्यालयात आजकाल घडणा-या लैंगिक शोषण व तरूणींच्या समस्या या विषयावर प्रबोधन आयोजित केले होते. प्रमुख …

‘आयुष्याच्या उंबरठ्यावर’ ही संकल्पना घेवून महिला दिन साजरा Read More »

महाशिवरात्रीला शिंगाड्याच्या पीठातून १०० हून अधिक जणांना विषबाधा

नागपुरातील धक्कादायक घटना नागपूर : नागपुरात (Nagpur) महाशिवरात्री निमित्त उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातील तब्बल १०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतले असून …

महाशिवरात्रीला शिंगाड्याच्या पीठातून १०० हून अधिक जणांना विषबाधा Read More »

कठीण परिश्रमाला पर्याय नाही-ब्रिगेडियर संदीप देशमुख

रामकृष्ण महाविद्यालय दारापूर येथे व्याख्यान अमरावती/प्रतिनिधी श्री दादासाहेब गवई चारिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रामकृष्ण महाविद्यालय दारापूर येथे दिनांक 9 मार्च 2024 रोजी ब्रिगेडियर संदीप देशमुख यांचे उद्बोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.भारतीय सैन्य दलात 35 वर्ष सेवा देत कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले ब्रिगेडियर संदीप देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी …

कठीण परिश्रमाला पर्याय नाही-ब्रिगेडियर संदीप देशमुख Read More »

महाशिवरात्रीच्या दिवशी गांधी आश्रम मध्ये ‘अग्नी तांडव’

सिलेंडर चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक महाशिवरात्रीच्या दिवशी जेथे अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री मनविल्या जात होती त्याच ठिकाणी रात्री आठच्या सुमारास प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम येथे असणाऱ्या वस्तीमध्ये असलेल्या एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने तब्बल तीन घरांना आग लागून तीनही घरे जळून खाक झाली.या आगीच्या घटनेमध्ये …

महाशिवरात्रीच्या दिवशी गांधी आश्रम मध्ये ‘अग्नी तांडव’ Read More »

महिलांची सामाजिक जनजागृती गरजेची- जिल्हाधिकारी

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांचा मोठा सहभाग अमरावती/ प्रतिनिधी-कायदा आणि इतर सर्वच विषयांमध्ये महिलांची सामाजिक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (पीसीपीएनडीटी कक्ष) आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा …

महिलांची सामाजिक जनजागृती गरजेची- जिल्हाधिकारी Read More »

वझ्झर धरण पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाक दाखवून लुटणारे चौघे ताब्यात

१ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त अचलपूर /प्रतिनिधी – तालुक्यातील वझ्झर धरण पाहून दुचाकीने गावी परतणाऱ्या युगलाला चाकुच्या धाकावर दोन मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.परतवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास वइझर धरण ते मोहीफाटा रोडवर मित्र व मैत्रीण दुचाकीने येत …

वझ्झर धरण पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाक दाखवून लुटणारे चौघे ताब्यात Read More »

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सहा ता. शिक्षकांना आचार्य पदवी

अमरावती /प्रतिनिधी- डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या सहा प्राध्यापकांना आचार्य पदविने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात डॉ.हिना देसाई, डॉ .लक्ष्मी परिहार(पवार),डॉ.रेणुका तळोकार,डॉ.रत्नाकर बनसोड, डॉ. कीर्ती मालपाणी,डॉ. अपेक्षा भूंबर यांना आचार्य पदविने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, …

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सहा ता. शिक्षकांना आचार्य पदवी Read More »

Scroll to Top